रत्नागिरी : गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर मासळीचे दर वधारले

Sep 16, 2024 - 12:58
Sep 16, 2024 - 13:03
 0
रत्नागिरी : गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर मासळीचे दर वधारले

रत्नागिरी : गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर मासळीचे दर मोठ्या प्रमाणात वधारले. पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमार नौका १ ऑगस्टपासून मासेमारी करण्यास समुद्रात जाऊ लागल्या. तेव्हापासून गौरी-गणपती विसर्जनापर्यंत मासळीचे दर फारच स्वस्त होते. उपवासांचे दिवस संपल्यानंतर माशांचे दर वाढले आहेत.

श्रावणातील उपवास सुरू झाल्यानंतर पापलेट - बेल्डा ५०० ते ६०० रुपये किलो दराने मिळत होते. हेच दर रविवारी १२०० रुपयांपर्यंत गेले. श्रावणात सरंगा मासा फार कमी प्रमाणात मिळत होता. आताही हा मासा कमी प्रमाणात मिळत असल्याने त्याचे किलोचे दर त्यावेळी ५०० ते ६०० रुपये किलोने होते तेच दर आताही तसेच आहेत.

श्रावणामध्ये सुरमई ३०० ते ४०० रु. किलो दराने मिळत होती, तीच सुरमई आता ९०० ते ९५० रुपये पर्यंत मिळत बांगडा, सरंगा, १५० ते २०० रु. किलो आहे. कोळंबी दराने उपवासांच्या दिवशी मिळत होते. याच मासळीचे दर आता ३०० ते ४०० रुपये पर्यंत पोहोचले आहेत.

दि. १ सप्टेंबरपासून सर्व प्रकारच्या मासेमारीला प्रारंभ झाला. मात्र, समुद्रात अजूनही वेगाने वारे वाहत असल्यामुळे काही नौका किनारीच उभ्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू झाली नसून त्यामुळेही दरावर परिणाम होत आहे. सध्या कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळत असून, तिचे दर मात्र सर्वसामान्यांना परवडणारे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow