मावळंगेत अजय पारकर यांनी मराठी शाळांचे वास्तव देखाव्यातून उमटले

Sep 16, 2024 - 14:21
Sep 16, 2024 - 17:18
 0
मावळंगेत अजय पारकर यांनी मराठी शाळांचे वास्तव देखाव्यातून उमटले

पावस : मराठी शाळांची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत आहे. ज्या मुलांनी मराठी शाळेतूनच शिकून उत्कर्ष केला त्या शाळांची स्थिती प्रत्येकाच्या लक्षात यावी आणि पुन्हा एकदा मराठी शाळांना गतवैभव प्राप्त व्हावे या हेतूने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठी शाळेची सध्याच्या स्थितीवर मावळंगे येथील अजय पारकर या तरुणाने देखावा केला आहे.

पारकर यांना लहानापासून चित्रकलेची आवड होती. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली. गेली आठ वर्षे मावळंगे येथे गणेशोत्सवात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत चांगला संदेश जावा यासाठी वेगवेगळ्या विषयावरील देखावे साकारत आहेत. यावर्षी त्यांनी मराठी शाळांची दयनीय अवस्था या संदर्भात देखावा केला आहे. अनेक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेमध्ये पाठवतात. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. आपण मराठी शाळेमध्ये शिकून मोठे झालो असलो तरी इंग्रजी शाळेमध्ये गेल्यास मुलांची चांगली प्रगती होते, असा गैरसमज पालकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण इंग्रजी माध्यमाकडे वळत आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळांची स्थिती वाईट झाली आहे. प्रत्येक पालकांनी पुढाकार घेतल्यास मराठी शाळांना पूर्वीचे दिवस येतील. हीच भावना रुजवण्यासाठी पारकर यांनी देखावा साकार केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow