राजापूर : अणसुरेत कणेरी कुटुंबांनी साकारली श्रीदेव धूतपापेश्वरची आरास

Sep 16, 2024 - 14:14
 0
राजापूर : अणसुरेत कणेरी कुटुंबांनी साकारली श्रीदेव धूतपापेश्वरची आरास

राजापूर : तालुक्यातील अणसुरे भराडेवाडी येथील जगन्नाथ कणेरी यांच्या निवासस्थानी प्रतिष्ठापित झालेल्या गणेशोत्सवामध्ये श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराची आरास करण्यात आली आहे. श्रीदेव धूतपापेश्वरचे मंदिर, पाठीमागे असलेले श्री दत्तमंदिर आणि तेथून वाहणाऱ्या मृडानी नदीवरील फेसाळत उंचावरून कोसळणारा धबधबा अशी हुबेहूब आरास कणेरी यांचे पुतणे स्वप्नील कणेरी आणि योगेश कणेरी यांनी तयार केला आहे.

ही आरास पाहताना श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराची महती सांगणारी ऑडिओ क्लिप आरास पाहणाऱ्या गणेशभक्त आणि ग्रामस्थांना एक वेगळा आनंद अन् श्री गणरायासोबत श्रीदेव धूतपापेश्वराचे दर्शन घेतल्याची अनुभूती देते. स्वप्नील आणि योगेश यांनी तयार केलेल्या या आरासाचे साऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow