खेड शहरातील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला मिळाला गणपती विसर्जनाचा मुहूर्त

Sep 16, 2024 - 14:46
Sep 16, 2024 - 14:55
 0
खेड शहरातील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला मिळाला गणपती विसर्जनाचा मुहूर्त

खेड : शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी नगरपालिकेकडून उधळपट्टी सुरू आहे. गेल्या महिन्यात काँक्रिटीकरणाने बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाला गणपती विसर्जनाचा मुहूर्त मिळाला. गुरुवारी (ता. १२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचे काम हाती घेण्यात आले. आधीच मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच खड्डे बुजविण्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. शहरातील तीनबत्ती नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटीस्थानक परिसर, महाडनाका या मुख्य मार्गांसह शहरात अंतर्गत रस्त्यांवरील बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच झाले. विसर्जनही खड्ड्यांतूनच होते की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. अखेर, गणपती विसर्जनाच्या दिवशी खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळाला. पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी ट्रॅक्टरसह रोलरचा वापर केला. त्यासाठी खेड- भरणे या मार्गावरील एकेरी वाहतुकीचा अवलंब करावा लागला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow