मंडणगड : संत परंपरेसह बारा बलुतेदार जीवनपद्धतीवर भाष्य करणारा पालघरवाडीत जिवंत देखावा

Sep 16, 2024 - 15:13
Sep 16, 2024 - 15:24
 0
मंडणगड : संत परंपरेसह बारा बलुतेदार जीवनपद्धतीवर भाष्य करणारा पालघरवाडीत जिवंत देखावा

मंडणगड : पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा महाराष्ट्राच्या संत पंरपरेची महती सांगत संतांचा गौरव करणारा जिवंत देखावा सादर केला आहे. या माध्यमातून ग्रामिण समाज जीवनावर आजही प्रभाव असलेल्या बारा बलुतेदारांच्या कार्यपद्धतीची नव्या पिढीला माहीती करून दिली, येथील चलचित्र देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे.

बदलत्या काळात महाराष्ट्राला लाभलेल्या वैचारिक व अध्यात्मिक पंरपरेचा विसर पडला आहे आणि त्याचे परिणाम येथील समाज जीवनावर होत आहेत.

ज्ञानेश्वरांपासून तुकारामपर्यंतच्या संत परंपरेची व त्यांनी मानव जातीस दिलेल्या विश्वकल्याणाच्या विचाराची नव्या पिढीस महती कळावी, या उद्देशाने पालघरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सर्व संताची माहीती देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकाचा विषय ठरत आहे. बारा बलुतेदार म्हणजेच वार्टर सिस्टीमने खेड्यांनी नटलेल्या देशाची ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था सांभाळली. पैशापेक्षा वस्तू व सेवांचे आदान-प्रदान करून अर्थकारणाचा पाया वर्षानुवर्षे हाकला जात होता. बदलत्या काळात चलनी नाणी व नोटांमुळे ही व्यवस्था मोडकळीस येऊन संपुष्टात आती असली, तरीही बारा बलुतेदारांच्या व्यवसायानुसार जातीत विभागणी झाली होती. ते व्यवसाय आजही सुरु आहेत. काळाच्या ओघात अनेक व्यवसाय मागे पडलेले किंवा कालबाह्य झालेले आहेत.

शासनस्तरावर बारा बलुतेदारांच्या प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या योजनांद्वारे सुरू आहे. या व्यक्सायांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वार्टर सिस्टीमने दीर्घकाळ या देशाची अर्थव्यवस्था सांभाळली असल्याने बठतुदेरांची कार्यपध्द‌तीची युवा पिढीता माहीती देण्याचे प्रामाणिक प्रयत्न मंडळाने केले आहे.

कष्टकरी व शेतकरी सभासद
पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७४ साली झाली असून, कष्टकरी व शेतकरी सभासदांनी एकत्र येऊन श्रमदान करत व टाकावू वस्तुंपासून टिकावू सजावट करीत देखावे सादर केले आहेत. भूतकाळात शासन व विविध संस्थाचे मानाचे पुरस्कार जिंकून मंडळाचा राज्यात मोठा नावलैकिक केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow