पुणे-पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर सायकल वारी...

Jun 21, 2024 - 12:54
Jun 21, 2024 - 16:59
 0
पुणे-पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर सायकल वारी...

दाभोळ : दापोलीतील सायकलप्रेमींनी १५, १६ व १७ जून २०२४ रोजी पुणे, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर असे तीन दिवसांत तब्बल ४५० किमी अंतर सायकलने पूर्ण केले. या सायकल वारीमध्ये दापोली सायकलिंग क्लबचे अंबरिश गुरव, यश भुवड, समीर गोलम हे सहभागी झाले होते. सोबत मुंबई येथील सतीश जाधव, शिवम खरात व बसवेश्वर पडेलकर यांनीही ही सायकल वारी पूर्ण केली.

दापोलीतील सायकलप्रेमींकडून पुणे, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर अशा सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांमध्ये तब्बल ४५० किमी अंतर कापण्याचे नियोजन करण्यात आहे होते. मोहिमेस १५ जूनला सुरुवात झाली. या सायकलप्रेमींनी पहिल्या दिवशी पुणे ते पंढरपूर २४० किमीची सायकल वारी इंडो अथलेटिक सोसायटी पुणे सोबत केली. दुसन्या दिवशी पंद्रपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट असा १२५ किमीचा सायकल प्रवास झाला. तिसऱ्या दिवशी अक्कलकोट ते गाणगापूर असा ८५ किमीचा सायकल प्रवास झाला. दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये चालत सहभागी व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. परंतु जास्त दिवस सुटी घेता येत नसत्यामुळे आम्ही पुणे, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या ४५० किमीच्या मार्गावर सायकल चालवत सायकल वारी केली. यासाठी आम्ही काही दिवसांपासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल कौतुक होत आहे.

सायकल वारी...
सायकलप्रेमींची पंढरीच्या वारीमध्ये चालत सहभागी व्हावे, अशी इच्छा आहे. परंतु जास्त दिवस सुटी घेता येत नसल्यामुळे सर्व सायकलप्रेमींनी पुणे, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या ४५० किमीच्या मार्गावर सायकल चालवत सायकल वारी केली असल्याचे अंबरिश गुरव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow