नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट

Jun 7, 2024 - 11:28
 0
नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. याठिकाणी मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचा ४७ हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला आहे.

निकालानंतर गुरुवारी नारायण राणे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी येऊन राज ठाकरेंची भेट घेत त्यांचे आभार मानले.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी पहिलीच सभा कोकणात घेतली होती. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या संबंध चांगले असल्याने राज ठाकरे कणकवली आले होते. त्याठिकाणी राज ठाकरेंनी राणेंसाठी मते मागितली होती. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्तेही महायुतीच्या प्रचारात सक्रीयपणे उतरले होते. त्यामुळे राणे यांनी आज राज ठाकरेंची भेट त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार नितेश राणे हेदेखील उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow