होप फाउंडेशन, फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा यांना पीएचडी पदवी प्रदान

Jun 7, 2024 - 13:59
 0
होप फाउंडेशन, फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा यांना पीएचडी पदवी प्रदान

त्नागिरी : होप फाउंडेशन, फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा यांना विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे या विद्यापीठाकडून पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.

श्रीमती अरुणा कटारा यांनी विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे येथील कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विभागात 'स्टडी ऑफ ॲडॅपटिव्ह एज्युकेशनल इनिशिएटिव्हज इन अनएडेड रूरल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्स' या विषयावर पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. या संशोधन प्रकल्पासाठी गाईड म्हणून डॉ उमेश पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.

पीएचडी पदवी प्राप्त करून 'शिक्षणाला वय नसतं' या उक्तीची त्यांनी प्रचिती आणून दिली. पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow