खबरदार इफेक्ट : कशेडी बोगद्यातून रुग्णवाहिका वाहतूकसाठी उदय सामंतांनी दिल्या सूचना

Jun 7, 2024 - 17:51
 0
खबरदार इफेक्ट : कशेडी बोगद्यातून रुग्णवाहिका वाहतूकसाठी उदय सामंतांनी दिल्या सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबईला जाणारे ऍम्ब्युलन्सला कशेडी बोगदयातुन वाहतूक करण्यासाठी परवानगी  देण्यात यावी अशी सूचना  ना. सामंत यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. याबाबतचे वृत्त दैनिक रत्नागिरी खबरदार ने कालच प्रसिद्ध केले होते. या बाबत अधिक माहिती अशी कि बशीर हजवानी फौंडेशनची रत्नागिरी येथील ऍम्ब्युलन्स मुंबई येते जात असताना त्यांना कशेडी बोगदयातून  जाण्यास  मनाई करण्यात आली. मुंबईतुन परत येताना या ऍम्ब्युलन्स चा चालक शमी मुकादम यांनी ऍम्ब्युलन्स जाण्यासाठी कुणी मनाई केली तसेच ऍम्ब्युलन्स जाऊ नये म्हणून लोखंडी खांब उभारण्यात आले होते. या बाबत पोलिसांनी हे काम ठेकेदारांनी केले आहे तसेच ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी हे पोलिसांनी केल्याचे सांगितले. हि माहिती रुग्ण वाहिकेतील डॉक्टर यांनी रत्नागिरी खबरदारला फोन करून कळविली. यानुसार रत्नागिरी खबरदार मधून वृत्त देखील प्रसारित करण्यात आले. चालक शमी मुकादम यांनी सिंधुरत्न समितीचे सदस्य  किरण सामंत यांना फोन करून हा विषय त्यांना सांगितला. या प्रकारची दखल तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी  घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ऍम्ब्युलन्स जाईल अशा प्रकारची सोय करण्याची सूचना केली.            अशा प्रकारे ऍम्ब्युलन्स जाण्याची सोय केल्याने कशेडी घाट मार्गे मुंबई जाण्यासाठी वेळ लागत असल्याने ऍम्ब्युलन्स मध्ये ही रुग्णाला त्रास होत होता. तसेच वेळ ही अधिक जात असल्याने रुग्णाला मुंबई पोहचण्यास विलंब होत होता. आता कशेडी बोगदयातून ऍम्ब्युलन्स जाण्याची सोय झाल्याने रुग्ण सुद्धा लवकर मुंबई ला उपचारासाठी पोहचू शकतो. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow