शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ'चा गाभारा डाळिंबानी सजला

Jun 10, 2024 - 13:30
 0
शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ'चा गाभारा डाळिंबानी सजला

पुणे : सोमवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे 4 ते 6 या वेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली.
 
सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत गणेशयाग, दुपारी 1 ते 3 सहस्त्रावर्तनं पार पडली. रात्री 9 ते 11 वेळेत गणेशजागर देखील पार पडला.

गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानलेला आहे.
 
भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले, त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले.
 
परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असं नाव दिलं. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केलं.
 
पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केलं. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकलं. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केलं. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केलं.
 
श्रीशेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितलं.
 
या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असं पण नाव प्राप्त झालं.
 
याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. यानिमित्ताने आज दगडूशेठ गणपती मंदिर सजलं आहे. मंदिरावर शेषनाग प्रतिकृतीची फुलांची सजावट करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow