गुहागर : आरजीपीपीएलमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता पंधरवडा अभियान

Jun 11, 2024 - 11:58
Jun 11, 2024 - 12:05
 0
गुहागर : आरजीपीपीएलमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता पंधरवडा अभियान

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये १६ ते ३१ मे या कालावधीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता पंधरवडा अभियान विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

या कालावधीमध्ये स्वच्छता अभियान, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व महिलांसाठी स्वच्छता विषयक निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा, स्वच्छता विषयक कर्मचारी व कामगार यांना जनजागृती, मार्गदर्शन शिबिरे, घरेलू महिला कामगारांना आरोग्य व स्वच्छता विषयक वस्तूंचे वाटप, महिलांना आरोग्य विषयक स्त्रीरोग डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन, वृक्ष लागवड, गुहागर समुद्रकिनारा व आयटीआय रानवी परिसर, हाउसिंग कॉलनी परिसर भागाची स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविण्यात आले.

येथील मैत्री क्लब हॉलमध्ये या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले, संजना महिला समिती अध्यक्ष सीमा तखेले, डी. सुरेश कुरूप, सिंधू सुरेश कुरूप, स्नेहासिस भट्टाचार्य (एजीम एचआर), पी. के. झा. (सीएफओ.), अशोक सरकार (एजीएम मेन्टेनन्स), सोनू शर्मा (असि. कमांडंट सीआयएसएफ), सुरजीत चटर्जी (प्रिन्सिपल, बालभारती पब्लिक स्कूल,) अमित शर्मा (मॅनेजर एच. आर), आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow