पुढच्या वर्षी शरद पवार 85 वर्षांचे होत आहेत, त्यामुळे आपल्याला 85 आमदार द्यायचे आहेत, रोहित पवारांचा निर्धार

Jun 11, 2024 - 11:29
Jun 11, 2024 - 12:50
 0
पुढच्या वर्षी शरद पवार 85 वर्षांचे होत आहेत, त्यामुळे आपल्याला 85 आमदार द्यायचे आहेत, रोहित पवारांचा निर्धार

मुंबई : "पुढच्या डिसेंबर महिन्यात शरद पवार 85 वर्षांचे होते आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला कमीत कमी 85 जागा निवडून द्यायच्या आहेत.

हा निश्चय आपण केला पाहिजे. मी काही गोष्टी स्पष्ट बोललो. निष्ठावंत पदाधिकारी ही आपली ताकद आहे. आपला पवार साहेबांचा विचार आहे. हा विचार शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झाला आहे", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलाय. यावेळी लंके बोलत होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.

लोकसभेत आपले 8 खासदार निवडून आले, 2 उमेदवार जिद्दीने लढले

रोहित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना , युवांना अनेक अडचणी आहेत. ते सगळे तुमच्याकडे बघतात. पवार साहेब एक विचार आहे. सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे उभा राहिला. लोकसभेत आपले 8 खासदार निवडून आले, 2 उमेदवार जिद्दीने लढले. नकली चोरलेली राष्ट्रवादी त्यांचा स्ट्राईक रेट हा केवळ 25 टक्के होता. विरोधक केवळ हिंदू मुस्लीम आणि जातीतजातीत तेढ निर्माण करत होते. शरद पवार हे दुष्काळाबद्दल आणि कांद्याबद्दल बोलत होते. लोकांच्या हितासाठी काम करावे लागते, ते पवार साहेब आणि आपण करत आहोत.

काही नेते दोन दगडांवर पाय ठेवून आहेत, त्यांना सांगा तिकडे जा किंवा इकडे या

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, पलिकडे गेलेले बोलत होते की, पवार साहेबांनी विश्रांती करावी. येणाऱ्या विधानसभेत साहेब त्यांना विश्राती देतील. भाजपा हद्दपार होईल. काही नेते दोन दगडांवर पाय ठेवून आहेत. त्यांना सांगा तिकडे जा किंवा इकडे या. काहींचे भाऊ तिकडे, बाप तिकडे असं चालणार नाही. पलिकडे सत्ता असली तरी लोकांनी त्यांना नाकारले आहे. विरोधकांनी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले. लोकांना हाताला काम पाहिजे, यासाठी आपण लढलो. देवेंद्र फडणवीस म्हणत होते, पवार साहेबांच्या राजकारणाचा एरा संपलाय. काल सेंट्रल हॉलमध्ये कसं बसले होते? असा सवालही रोहित पवार यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow