Ratnagiri: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा रत्नागिरी येथील हॉटेल सावंत पॅलेस येथे शनिवार दिनांक १८एप्रिल २०२६ ला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

स्नेह मेळाव्यात संपूर्ण देशभरात स्थाईक झालेले ३०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रत्नागिरी सा बां मंडळाचे प्रथम अधीक्षक अभियंता निवृत्त सचिव श्री श रा तांबे, निवृत्त सचिव श्री आर आर केडगे, निवृत्त मुख्य अभियंता श्री आर एस शिंदे आणि असंख्य वरिष्ठ निवृत्त अधिकारी मोठ्या आत्मीयतेने सहभागी झाले होते. आपल्या सेवा कालावधीतील सहकाऱ्यांना भेटून गत स्मृतींना उजाळा देण्याचे आणि स्नेह बंध दृढ करण्याचे भाग्य या स्नेह मेळाव्यामुळे शक्य झाले असे असंख्य उपस्थितांनी व्यक्त केले. स्नेह मेळाव्यात आपली ऊर्जा वाढवून असा स्नेह मेळावा ठराविक कालावधी नंतर पुन्हा पुन्हा आयोजित व्हावा आणि त्या स्नेह मेळाव्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभावे असे सहभागी सदस्यांनी प्रदर्शित केले.

या स्नेह मेळाव्यात ८० वर्षा वरील ज्येष्ठ सहकाऱ्यांचा स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. सर्वात ज्येष्ठ श्री रामचंद्र वडके हे महाड येथून आले होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सहभागी सदस्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर चहापान व पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

संयोजन समितीच्या १६ सदस्यांच्या टीमने स्नेह मेळाव्याचा यशस्वीततेसाठी अथक तीन महिने घेतलेल्या कष्टाबद्दल उपस्थितांनी प्रशंसा केल्याने संयोजन समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 20-04-2026