Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांनी थेट भारताला (India) ‘नरक’ संबोधल्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय वाद ओढवून घेतला आहे.
ट्रम्प यांच्या या निंदनीय विधानाचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडक शब्दांत निषेध केला असून, आता इराणनेही (Iran) भारताची बाजू घेत ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Donald Trump: नेमके प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी कट्टरपंथी लेखक आणि रेडिओ होस्ट मायकेल सॅवेज यांनी स्थलांतरितांच्या विरोधात एक तिरस्कारपूर्ण पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी म्हटले होते की, “बाहेरून आलेले लोक अमेरिकेत जन्म घेताच नागरिक बनतात आणि त्यानंतर ते चीन किंवा भारतासारख्या जगातील इतर ‘नरकातून’ आपल्या संपूर्ण कुटुंबाला इथे घेऊन येतात.” विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी हीच पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर (Repost) केली.
Iran on Donald Trump: इराणने ट्रम्प यांना सुनावले
ट्रम्प यांच्या या कृत्यानंतर मुंबईतील इराणच्या ‘कॉन्स्युलेट जनरल’ (High Commission) ने ‘एक्स’वर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे सौंदर्य आणि संस्कृती दाखवण्यात आली आहे. इराणने ट्रम्प यांना टोला लगावताना लिहिले की, “कदाचित मिस्टर ट्रम्प यांच्यासाठी ‘कल्चरल डिटॉक्स’ची गरज आहे, जेणेकरून त्यांच्याकडून येणारी ही बेताल वक्तव्ये थांबतील. मिस्टर ट्रम्प, कधी तरी भारतात येऊन तर पहा, मग बोला!”
India on Donald Trump: परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या या विधानाला ‘अज्ञानतापूर्ण’ आणि ‘खराब मानसिकतेचे लक्षण’ म्हटले आहे. भारतासारख्या महान लोकशाही देशाबद्दल अशा प्रकारचे शब्द वापरणे पूर्णपणे अनुचित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Donald Trump: अमेरिकेकडून सारवासारव
वाढता वाद पाहून भारतातील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे भारतासोबतचे संबंध खूप चांगले आहेत आणि त्यांनी नेहमीच भारताला एक महान देश मानले आहे,” असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 24-04-2026














