उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत यांचा ५० वा वाढदिवस रत्नागिरीत उत्साहात साजरा!

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक महेश सामंत यांचा ५० वा वाढदिवस रत्नागिरीत उत्साहात साजरा!

मित्रपरिवारातर्फे केक कापून अभिष्टचिंतन; कर सल्लागार राजेश सोहनी यांच्या कार्यालयात पार पडला स्नेहमेळावा

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक (पीए) महेश सामंत यांचा ५० वा वाढदिवस (सुवर्णमहोत्सवी अभिष्टचिंतन) आज रत्नागिरीत त्यांच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कर सल्लागार राजेश सोहनी यांच्या कार्यालयात आयोजित या विशेष कार्यक्रमात केक कापून महेश सामंत यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

वैद्यकीय मदत आणि संयमी स्वभावामुळे जोडला मोठा मित्रपरिवार :

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतानाच, महेश सामंत हे गरजू व विविध रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठीही सदैव तत्पर राहून परिश्रम घेत असतात. त्यांच्या शांत, मनमिळावू आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवारही तितकाच मोठा आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचा आणि मैत्रीचा सन्मान करत मित्रपरिवाराने एकत्र येऊन त्यांच्या ५० व्या वाढदिवसाचे खास आयोजन केले होते.

#concepts\'

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती :

या अभिष्टचिंतन सोहळ्याला रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कर सल्लागार राजेश सोहनी, ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू, नगरसेवक सौरभ मलुष्टे, इंजिनिअर संदीप आंबेकर, शिवसेना विभागप्रमुख मनोज साळवी, नरेंद्र देसाई, फिरोज गवाणकर, सीए अभिजित पटवर्धन, रत्नाकर जोशी, मनोज मुळे, विराज साळवी, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी आणि अभिजित घोडके यांच्यासह मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन महेश सामंत यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.