आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६

मेष – आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील.

वृषभ – आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल.

आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल.

मिथुन – आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा व व्यवहारात नम्रपणे वागावे लागेल.

कर्क – आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

सिंह – नोकरी – व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. वाहन व संपत्ती ह्या संबंधीची कामे सहज पूर्ण होतील. सरकारी कामात सुद्धा यश मिळेल.

कन्या – आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यासाठी पैसा खर्च होईल.

तूळ – आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक – आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल.

धनु – आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल.कार्यालयात सहकारी व हाताखालच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा संभव आहे.

मकर – शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही.द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील.

कुंभ – आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आई कडून लाभ होईल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

मीन – महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य ह्यामुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 18-05-2026