खेड : विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील पोयनार- कोंडीवाडी येथील एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय हनुमंत धुमक (५९, रा. पोयनार कोंडीवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.
विजय धुमक हा आपल्या ताब्यात विनापरवाना असलेल्या ५० हजार रूपये किंमतीच्या सिंगल बॅरल असलेल्या ठासणीच्या बंदुकीसह लहान-मोठे छरे व गनपावडरसह २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आढळून आला. म्हणून विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी खेड पोलिस स्थानकाचे शिपाई राहुल रामचंद्र कोरे यांनी फिर्याद दिल्यावरून विजय धुमक याच्यावर भारतीय शत्र अधिनियम कलम ३, २५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला बी. एन. एस. एस. ३५ (३) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 02-11-2024