लांजा येथे एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकासह कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

२ वर्षांच्या बालकासह तिघे जखमी; एसटी बसचालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी बातमी अनुसार, लांजा तालुक्यातील केळंबे विभुते स्टॉपजवळ भरधाव एसटी बसने रिक्षाला समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबातील २ वर्षांच्या बालकासह तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरुख-लांजा मार्गावर घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना १८ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी २३ जुलै रोजी सायंकाळी ४:२३ वाजता लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी चालक विश्वास कनावजे हा आपली एसटी बस (क्रमांक MH 12 BT 2667) घेऊन देवरुख-साखरपा-कोर्ले मार्गे लांजाच्या दिशेने जात होता. केळंबे विभुते स्टॉपजवळ आला असता, चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता एसटी बस अत्यंत हयगयीने आणि अविचाराने चालवली. याच दरम्यान लांजा ते विवली दिशेने जाणाऱ्या रिक्षाला (क्रमांक MH 08 AQ 1890) एसटी बसने समोरून जोरदार धडक दिली.

अपघातात २ वर्षांच्या बालकासह कुटुंबातील ३ जण जखमी

या भीषण अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींची नावे खालीलप्रमाणे:

  • प्रशांत नारायण वाघधरे (वय ६५ वर्षे, रा. वैभव वसाहत, लांजा)
  • सौ. पल्लवी प्रशांत वाघधरे (वय ६० वर्षे, रा. वैभव वसाहत, लांजा)
  • पार्थ पारीतोष वाघधरे (वय २ वर्षे, रा. वैभव वसाहत, लांजा)

लांजा पोलिसांकडून गुन्हा दाखल

लांजा पोलीस ठाणे मोटार अपघात रजिस्टर नंबर ०९/२०२६ वरील प्राप्त कागदपत्रांच्या आधारे तपासाअंती उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील सविस्तर तपास लांजा पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 25-07-2026