Maharashtra Monsoon Update : राज्यभर उन्हाचा तडाखा वाढत असताना आता मान्सूनपूर्व पावसाच्या सरी मुंबई आणि पुणेकरांना दिलासा देणार आहेत.(Maharashtra Monsoon Update)
हवामान विभागाने पुढील ४८ तासांत मुंबई, उपनगर आणि पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.(Maharashtra Monsoon Update) मुंबई महानगरात आज (२१ मे) पासून ढगाळ वातावरण निर्माण होणार असून, दुपारनंतर किंवा सायंकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)
शुक्रवार आणि शनिवारदरम्यान पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Maharashtra Monsoon Update)
कोकणात मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात
मान्सूनपूर्व पाऊस काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीवर दाखल झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरातून सक्रिय झालेल्या वातावरणीय बदलांमुळे किनारपट्टी भागात आर्द्रता वाढली आहे.
भारतात नैऋत्य मोसमी पावसाचे अंदमान-निकोबारमध्ये आगमन झाले असून, पुढील काही दिवसांत केरळमध्येही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावरही दिसू लागला आहे.
मुंबईत ढगांची दाटी; मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या १२ तासांत मुंबईच्या वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. शहरावर ढगांची दाट चादर पसरली असून, उकाड्यातून काहीसा दिलासा मिळू लागला आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारपासून पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल; मात्र शुक्रवारपासून काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
पुण्यातही हवामान बदलणार
पुण्यातही शुक्रवार (२२ मे) पासून मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुण्यात कमाल तापमानात अचानक ३ अंश सेल्सिअसने घट झाली. तापमान ४० अंशांवरून ३७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.
संध्याकाळनंतर शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला.
IMD चा अंदाज काय सांगतो?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पुण्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल. शुक्रवारपासून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
किमान तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
मुंबईतही पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
मान्सूनपूर्व पावसामुळे अचानक हवामान बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावेत, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
तसेच वीजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर जाणे टाळावे
झाडाखाली थांबू नये
वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
उकाड्यातून मिळणार दिलासा
राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले होते.
अशा परिस्थितीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 21-05-2026














