मेष – आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल.
वृषभ – वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे.
मिथुन – वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शक्यतो वाद -विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे.
कर्क – ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील.
सिंह – आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल.
कन्या – आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल.
तूळ – आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात.
वृश्चिक – आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
धनु – आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.
मकर – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल.
कुंभ – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील.
मीन – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 27-05-2026














