अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयात?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच वयाची ८० वर्षे पूर्ण करणार आहेत. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धात गुंतला असतानाच ट्रम्प यांच्या प्रकृतीच्या समस्येबाबतच्या बातम्या समोर आल्या आहेत.

तसेच दुसऱ्या कार्यकाळामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे चौथ्यांदा वैद्यकीय तपासणी करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच वयाची ८० वर्षे पूर्ण करणार आहेत. तसेच तत्पूर्वी त्यांच्या वैद्यकीय तपासणीचं वृत्त आल्याने त्याची चौफेर चर्चा होत आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाताला दुखापत आणि शरीर सुजलेलं दिसत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार १४ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प हे वयाची ८० वर्षे पूर्ण करणार आहेत. तसेच राष्ट्राध्यक्ष पदावर कार्यरत असताना वयाची ८० वर्षे पूर्ण करणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे २६ मे रोजी वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये आपली वार्षिक तपासणी करून घेणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली होती.

त्यातच काही अमेरिकन प्रसारमाध्यमांतील वृत्तांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावर दुखापतीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याशिवाय पायाच्या खालच्या भागावर सूज दिसून आली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करणाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प हे पूर्णपणे स्वस्थ असल्याचे सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 27-05-2026