आजचे राशीभविष्य, २९ मे २०२६

मेष – आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो.

वृषभ – आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल.

मिथुन – आज शरीर व मन बेचैन राहील.

नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील.

कर्क – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील.

सिंह – आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल.

कन्या – आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे.

तूळ – रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक – आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल.

धनु – आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल.

मकर – आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो.

कुंभ – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील.

मीन – आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 29-05-2026