आजचे राशीभविष्य, ३० मे २०२६

मे – आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ – व्यापार – व्यवसायात यश प्राप्ती होईलआर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. वस्त्र व गृहोपयोगी वस्तू ह्यांच्या खरेदीवर खर्च होईल.

मिथुन – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क – आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल.

सिंह – आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज टाळणे हितावह राहील.

कन्या – आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज केलेली गुंतवणूक लाभदायी राहील. नशिबाची साथ मिळेल.

तूळ– आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील. आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणे रास्त ठरेल.

वृश्चिक – आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल.

धनु – आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. प्राप्तीच्या मानाने खर्च अधिक होईल.

मकर – आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांपासून सुद्धा लाभ संभवतो.

कुंभ – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते.

मीन – आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात सावध राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतात.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 30-05-2026