रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या १ जूनपासून पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा (मुंबई) येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतील, असेही हवामान केंद्राच्या अहवालात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 30-05-2026














