‘नीट’ पुनर्परीक्षा ऑनलाइन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; २१ जूनची पुनर्परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार

नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ ची पुनर्परीक्षा संगणकाधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आधीच अनेक अडचणींचा सामना करत असल्याचे नमूद करत न्यायालयाने या टप्प्यावर अशा प्रकारचा आदेश देण्यास नकार दिला.

न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुधाकर सिंह आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिका २७ जुलै रोजी सुनावणीसाठी ठेवली. मात्र, सध्याच्या लेखी परीक्षा पद्धतीऐवजी संगणकाद्वारे पुनर्परीक्षा घेण्याची मागणी मान्य केली नाही. ही पुनर्परीक्षा २१ जून रोजी नियोजित वेळेनुसारच होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 02-06-2026