रत्नागिरी: फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाऊंडेशनकडून ६ अंगणवाड्यांचे नूतनीकरण

xr:d:DAFxsIfUBZs:2,j:5454265627472056213,t:23101908

कंपनीच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी

रत्नागिरीत फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाऊंडेशनकडून ६ अंगणवाड्यांचे नूतनीकरण: फिनोलेक्स कंपनीला यशस्वी ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उत्तम वातावरण मिळावे, या उद्देशाने फिनोलेक्सच्या ‘सीएसआर’ (CSR) उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनद्वारे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या सर्व नूतनीकृत अंगणवाड्यांचा भव्य उद्घाटन सोहळा १८ जून रोजी स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. (रत्नागिरी ग्रामीण ब्यूरो वृत्त).

छाब्रिया दांपत्याच्या कल्पनेतून साकारला बालमैत्रीपूर्ण प्रकल्प

मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक परिसर, सुधारित पायाभूत सुविधा आणि बालमैत्रीपूर्ण वातावरणामुळे येथील लहान मुलांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासाला आता नवी गती मिळणार आहे. मुकुल माधव फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असून, या नूतनीकरणामुळे स्थानिक समुदायातून फाऊंडेशनचे विशेष आभार मानले जात आहेत.

गोळप आणि फणसोपमधील ‘या’ अंगणवाड्यांचा कायापालट

“या विशेष उपक्रमांतर्गत गोळप गावातील रनपार, गुरववाडी, गोळप सडा आणि शिरंबाडवाडी तसेच फणसोप गावातील फणसोप (मराठी) आणि मागलाड येथील अंगणवाड्यांचा कायापालट करण्यात आला आहे. नूतनीकरणादरम्यान अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती, बोलक्या भिंती, आकर्षक रंगकाम, आधुनिक स्वच्छतागृह सुविधा तसेच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.” — आयोजक प्रतिनिधी, मुकुल माधव फाऊंडेशन

गोळप आणि फणसोप येथील सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

गोळप येथे आयोजित उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील व समाजसेविका तथा मुकुल माधव फाऊंडेशनच्या सल्लागार श्रीमती रुची महाजनी, अॅड. गौरव महाजनी, गोळपच्या सरपंच प्रियांका पंकज सुर्वे, उपसरपंच संदीप तोडणकर आणि माजी सरपंच उमंग साळवी उपस्थित होते. या कामात मोलाचे योगदान देणारे कंत्राटदार सुयोग आंबेरकर व ओंकार भेकरे यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

दुसरीकडे, फणसोप येथील कार्यक्रमाला युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, समिती सदस्या अर्चना साळवी, सरपंच राधिका साळवी, माजी सरपंच गिरीराज साळवी, फणसोप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोज साळवी आणि ग्रामपंचायत सदस्य राकेश साळवी व मिलिंद कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फिनोलेक्स आणि फाऊंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या संपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे डायरेक्टर (टेक्निकल) रामबाबू सांका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, प्लांट एचआर हेड नंदकिशोर शिंपी, सिव्हिल हेड अमित घोरपडे, विकास कुरतडकर आणि आशिष आठवले यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने शुभम भेगडे, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे यांनी उपस्थित राहून व्यवस्थापन सांभाळले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 20-06-2026