India Womens Hockey Team Win: भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; चीनला नमवत ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!

ऐची-नागोया येथील अंतिम सामन्यात भारताची १-० ने मात; २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठीही थेट पात्रता

India Womens Hockey Team Win चा ऐतिहासिक क्षण २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळाला आहे. महिला हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने गतविजेत्या चीनचा १-० असा पराभव करत तब्बल ४४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासह भारतीय महिला हॉकी संघाने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अधिकृत पात्रता मिळवली आहे. १९८२ नंतर प्रथमच भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

लालरेम्सियामीचा निर्णायक गोल अन् भारताला आघाडी

ऐची-नागोया येथे झालेल्या या रोमांचक अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये, म्हणजेच १० व्या मिनिटाला भारताची स्टार खेळाडू लालरेम्सियामीने जबरदस्त मैदानी गोल करत भारताला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हा एकमेव गोल अखेरपर्यंत भारताच्या सुवर्णविजयासाठी निर्णायक ठरला.

गोलरक्षक सविता पुनियाची ‘भिंत’; चिनी आक्रमण हाणून पाडले

पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या सत्रात चिनी संघाने अत्यंत आक्रमक खेळ करत भारतीय संघावर प्रचंड दबाव आणला. सामन्यादरम्यान चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, ज्यामुळे त्यांना सामना बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, भारताची अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाने अचूक वेध घेत उत्कृष्ट बचाव केला आणि चीनचा गोल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरवला. खेळाच्या २८ व्या मिनिटाला फाऊल केल्यामुळे चीनची खेळाडू वेन डॅन हिला पंचांनी ‘ग्रीन कार्ड’ दाखवले. उर्वरित ५० मिनिटांत चिनी खेळाडूंनी भारतीय बचावफळी भेदण्याचे सर्व प्रयत्न केले; परंतु सविता पुनिया आणि भारतीय बचावपटूंनी भक्कम बचाव करत १-० अशी आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली.

आशियाई स्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी अत्यंत खास ठरला. भारताने एकाच दिवशी एकूण ६ सुवर्णपदकांसह तब्बल १३ पदकांची कमाई केली. या शानदार कामगिरीमुळे भारताने पदक तालिकेत पाचवे स्थान पटकावले असून, भारताच्या एकूण पदकांची संख्या आता ७६ वर पोहोचली आहे.

Shanti2

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 03-10-2026