चंपक मैदान येथे विनापरवाना हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई

रत्नागिरी : शहराजवळील चंपक मैदान येथील झाडीच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ५१५ रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल हानिफ मिरकर (रा. झाडगाव, एमआयडीसी शिरगाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास चंपक मैदान येथील झाडीच्या आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल दर्शना आंब्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 24-09-2024