रत्नागिरीत भातलावणीच्या कामांची लगबग; बळीराजा सुखावला

रत्नागिरी :

कोकणात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि इतर भागात कृत्रिम पाण्यावर जगवलेल्या भात रोपवाटिका आता लावणीसाठी सज्ज झाल्या आहेत.

पावसाच्या सातत्यपूर्ण सरींमुळे शेतकरी आणि महिला वर्ग चिखलात उतरून भातलावणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. काही भागांत रोपे तयार होण्यासाठी अजून १५ ते २० दिवसांचा अवधी लागणार असला, तरी या पावसामुळे कोकणच्या भातशेतीला नवे जीवन मिळाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 02-07-2026