ज्योतिषशास्त्रीय गणितांचा अंदाज
मुंबई:
Shani Transit 2026: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीमध्ये मोठा बदल झाला असून २ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:२२ वाजता शनीने रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या नक्षत्र बदलामुळे (Shani Transit 2026) सर्वच राशींवर बरे-वाईट परिणाम दिसून येणार आहेत. मात्र, ४ विशिष्ट राशींना या काळात आर्थिक, मानसिक आणि करिअरच्या पातळीवर काही आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात गुंतवणूक आणि खर्चाच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिषतज्ज्ञांनी दिला आहे.
मेष राशीसाठी आर्थिक नुकसानीचा धोका
नक्षत्र बदलाच्या या कालावधीत मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबींमध्ये कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अनावश्यक खर्चात अचानक वाढ झाल्यामुळे तुमचे पूर्वनियोजित बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. या काळात कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करणे किंवा व्यावसायिक पातळीवर जोखमीचे निर्णय घेणे टाळावे; अन्यथा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
सिंह राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी अडचणी
सिंह राशीसाठी शनीचे हे नक्षत्र परिवर्तन फारसे अनुकूल नसून कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी करू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे सहकाऱ्यांसोबत किंवा वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामाचा अतिरिक्त ताण वाढल्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. व्यावसायिकांनी नवीन योजना अमलात आणताना किंवा मोठे व्यवहार करताना प्रत्येक पाऊल जपून टाकणे गरजेचे आहे.
वृश्चिक राशीने व्यवहारात आंधळा विश्वास ठेवणे टाळावे
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणार आहे. या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे आर्थिकदृष्ट्या हानिकारक ठरू शकते. कोणालाही पैसे उधार देणे किंवा नवीन व्यावसायिक करारांवर स्वाक्षरी करणे यांसारख्या गोष्टी तूर्तास लांबणीवर टाकाव्यात. कोणताही कौटुंबिक किंवा आर्थिक निर्णय घाईगडबडीत न घेता संयम राखणे फायदेशीर ठरेल.
कुंभ राशीच्या खर्चात अचानक होणार वाढ
कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनी असला, तरी या विशिष्ट नक्षत्र बदलाचे प्रतिकूल परिणाम या राशीच्या व्यक्तींना जाणवू शकतात. घरगुती किंवा इतर कारणांमुळे खर्चात अचानक मोठी वाढ झाल्याने आर्थिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी भागीदारीचे नवीन व्यवहार करताना बाजारपेठेचा आणि संबंधित व्यक्तींचा सखोल अभ्यास करावा, तसेच कोणत्याही कायदेशीर किंवा वैयक्तिक वादापासून स्वतःला दूर ठेवावे.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 02-07-2026














