रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक आणि गोमांस विक्री यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २३ मे २०२६ पासून एक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात चार विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर थेट ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
मोहिमेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
- कायद्यांची कडक अंमलबजावणी: महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत ही कारवाई केली जात आहे.
- जिल्हास्तरीय नियंत्रण: या संपूर्ण मोहिमेचे मुख्य नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक काम पाहत आहेत.
- गावपातळीवर समन्वय: गावपातळीवरून अचूक माहिती मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांवर समन्वयकाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- गोपनीयता: माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भरारी पथके आणि संपर्क क्रमांक
जिल्ह्यातील चार पोलीस उपविभागांसाठी तैनात करण्यात आलेली भरारी पथके आणि त्यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:
| पथक क्र. | अधिकारी | उपविभाग (कार्यक्षेत्र) | संपर्क क्रमांक |
|---|---|---|---|
| पथक १ | पो. उपनिरीक्षक श्री. श्रीकृष्ण येवले | खेड उपविभाग | 8779645091 |
| पथक २ | पो. उपनिरीक्षक श्री. ओम आघाव | चिपळूण उपविभाग | 7776059378 |
| पथक ३ | पो. उपनिरीक्षक श्री. सागर शिंदे | रत्नागिरी उपविभाग | 9028389445 |
| पथक ४ | पो. उपनिरीक्षक श्री. सुधिर उबाळे | लांजा उपविभाग | 7350028482 |
| मुख्य नोडल अधिकारी | पो. निरीक्षक श्री. नितीन ढेरे | स्थानिक गुन्हे शाखा (LCB) | 9011995777 |
नागरिकांसाठी थेट आवाहन: परिसरात गोवंशीय हत्या किंवा अवैध वाहतुकीची कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२ (आपत्कालीन हेल्पलाईन) वर किंवा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या 8857848157 या थेट क्रमांकावर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 03-07-2026














