Ratnagiri: ‘शीळ’ धरण ओव्हरफ्लो!

हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ५ जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दिवस-रात्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे स्थानिक जनजीवन प्रभावित झाले असून नद्या आणि धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे.

संततधार पावसामुळे शीळ धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे रत्नागिरी शहर आणि परिसरातील ग्रामीण भागावर असलेले पाणीटंचाईचे संकट आता पूर्णपणे टळले आहे. नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जनजीवनावर परिणाम: सततच्या संततधार पावसामुळे स्थानिक जनजीवन प्रभावित झाले असून, नागरिकांना आणि मच्छीमारांना किनारपट्टी भागात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 04-07-2026