उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई / विशेष प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक फेरबदलांची घोषणा करण्यात आली असून NCP Youth President Appointed अंतर्गत युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची तर महिला प्रदेशाध्यक्षापदी वैशाली नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथील ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष मान्यतेने आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संमतीने या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘देवगिरी’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर वैशाली नागवडे आणि निखिल ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व नियुक्तीपत्र प्रतिमेसमोर ठेवून आशीर्वाद घेतले.
पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित
या महत्त्वाच्या नियुक्ती सोहळ्यादरम्यान पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण तसेच प्रदेश कार्यालयीन सचिव संजय तटकरे यांच्यासह पक्षाचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी आणि तरुण व महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या नव्या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 05-08-2026














