Ratnagiri NCMC Card Camp: रत्नागिरीत नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्या सौजन्याने ‘NCMC कार्ड’ नोंदणी कॅम्पचे आयोजन

साळवी स्टॉप येथे शनिवार व सोमवारी नोंदणी; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात मिळणार घसघशीत सवलत

रत्नागिरी:

रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांच्या सोयीसाठी आणि विविध शासकीय सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरसेवक सौरभ सुरेश मलुष्टे यांच्या सौजन्याने विशेष NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – National Common Mobility Card) नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

हा नोंदणी कॅम्प शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ आणि सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री ९:०० या वेळेत बाळासाहेब ठाकरे ॲक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.

NCMC कार्डचे मुख्य फायदे:

  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक: राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या प्रवासात १००% सवलत (मोफत प्रवास).
  • ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक: एस.टी. प्रवासात ५०% सवलत.
  • १० वर्षांवरील सर्व महिला: एस.टी. प्रवासात ५०% सवलत.

नोंदणीसाठी आवश्यक बाबी व कागदपत्रे:

  1. कार्ड नोंदणी शुल्क: ₹२००
  2. आवश्यक कागदपत्रे/बाबी: आधार कार्ड, चालू मोबाईल क्रमांक आणि संबंधित व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

या विशेष नोंदणी कॅम्पसंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी नागरिकांनी शिवराज पाटील (८३२९४८४७८७) अथवा चिनार आचरेकर (९९७०८४१४४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

प्रभागातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपले NCMC कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन नगरसेवक सौरभ सुरेश मलुष्टे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 07-08-2026