Badlapur Case: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया..

पुणे: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा काल(सोमवारी) मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.

अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. राज्यात सध्या या प्रकरणावर वातावरणं चांगलचं तापलं आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. या घटनेवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय शिंदे ह नराधम होता, त्याने केलेल्या कृत्यानंतर बदलापूर संतप्त होते. महिला असुरक्षित म्हणून विरोधक ओरडत होते. त्या विकृताने पोलीसाचे हत्यार घेवून पोलिसांवर फायारींग केले त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणार्थ त्याला मारला मी समर्थन करीत नाही त्याची चौकशी होईल. मात्र, आता याचे राजकारण विरोधक करत आहेत. मृत अक्षय शिंदेला त्याची पत्नीही विकृत म्हणते, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला काल(सोमवारी) सायंकाळी सव्वा सहा वाजता तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते. त्यावेळी अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. यात निलेश मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. यानंतर अक्षय शिंदेला कळवा महापालिका रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान या घटनेत अनेक खुलासे समोर येत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार आरोपी अक्षयच्या हातात कस्टडी लावली नव्हती. त्याच्यासोबत एक अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचारी होते. मुंब्रा बायपास रोडवर सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत. असते तर तोही ठोस पुरावा झाला असता. लवकरच ठाण्यात आम्ही 600 कोटींचा सीसीटिव्ही कॅमेरा प्रकल्प राबवत आहोत. या प्रकल्पांतर्गत 6 हजार सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. गुन्ह्याचा तपास लवकरच सीआयडीकडे दिला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

या घटनेत गाडीत अचानक अक्षय पोलिसांना मला जाऊ द्या, मला कधी सोडणार असे म्हणत अक्षय आक्रमक झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात ही घटना झाली असल्याने तपास मुंब्रा पोलिसांकडे दिला आहे. याबाबत ठाणे पोलिसांनी सीआयडी आणि पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाच्या तपासाबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. गाडीमध्ये गोळीबार झाल्याबाबतचे पुरावे जप्त केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 24/Sep/2024