रत्नागिरी विभागातून परतीच्या प्रवासाचे ऑनलाइन बुकिंग वेगाने सुरू; चाकरमान्यांनी तातडीने बुकिंग करण्याचे आवाहन
रत्नागिरी:
Ratnagiri MSRTC Bus Booking Ganeshotsav अंतर्गत आगामी गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या सुखकर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी एसटी विभागाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्याहून कोकणात येणाऱ्या आणि सण संपल्यानंतर पुन्हा शहरात परतायच्या प्रवासासाठी तब्बल २,५०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये परतीच्या प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षणाला चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ९ आगारांतून तब्बल २२५ हून अधिक एसटी बसेसचे बुकिंग पूर्ण झाले आहे.
गणेशोत्सवानंतरच्या प्रवासासाठी विशेष नियोजन
यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणार आहे. मुंबई, पुण्यासह इतर शहरांतून लाखांच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी दाखल होत असतात. रेल्वेसह एसटी महामंडळाने चाकरमान्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. रत्नागिरी एसटी विभागामार्फत परतीच्या प्रवासासाठी टप्प्याटप्प्याने बसेसचे आरक्षण खुले केले जात असून महामंडळाच्या अधिकृत ॲप आणि वेबसाइटवरून तिकीट बुकिंग सुरू आहे. तसेच ग्रुप बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महत्त्वाचे आकडेवारी आणि सवलती:
- मुंबईतून येणाऱ्या बसेस: २,००० हून अधिक
- परतीच्या प्रवासासाठी बसेस: २,५०० बसेस
- आतापर्यंत झालेले आरक्षण: २२५ हून अधिक बसेस
- महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत: महिलांना तिकीट दरात ५०% सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५०% तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १००% मोफत प्रवासाची सवलत लागू राहील.
Ratnagiri MSRTC Bus Booking Ganeshotsav: विभाग नियंत्रकांचे आवाहन
— आश्वजीत जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी एसटी विभाग
“गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या सुखकर परतीच्या प्रवासासाठी जादा बसेसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत २२५ बसेसचे बुकिंग झाले आहे. ज्यांनी अद्याप तिकीट बुकिंग केले नाही, त्यांनी तातडीने ऑनलाइन बुकिंग करावे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 20-08-2026














