१ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख; ३१ ऑगस्टला प्रारूप तर ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी
मुंबई:
Election Commission Maharashtra Voter List Revision 2026 अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Summary Revision) सुधारित कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. या प्रक्रियेत १ ऑक्टोबर २०२६ ही नवीन पात्रता तारीख (Qualifying Date) म्हणून निश्चित करण्यात आली असून त्यानुसार सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.
वेळापत्रकात बदल का करण्यात आला?
राज्यभरातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण (Rationalization) करणे आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक:
- २४ ऑगस्ट २०२६: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण करणे.
- ३१ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदार यादी (Draft Electoral Roll) प्रसिद्ध करणे.
- ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६: दावे व हरकती (Claims & Objections) स्वीकारण्याचा कालावधी.
- ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६: प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटिसा पाठवणे आणि त्यांचा निपटारा करणे.
- ४ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) प्रसिद्ध करणे.
Election Commission Maharashtra Voter List Revision 2026: नागरिकांसाठी महत्त्वाची संधी
दावे व हरकतींसाठी महिन्याचा कालावधी
३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी, नवीन नाव नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या उपक्रमामुळे १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र तरुणांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
मतदार यादीतील नाव तपासणी, नवीन नोंदणी किंवा इतर मार्गदर्शक माहितीसाठी नागरिक भारत निवडणूक आयोग (ECI) किंवा महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी (CEO Maharashtra) यांच्या अधिकृत पोर्टल्सना भेट देऊ शकतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 20-08-2026














