Guhagar ST Bus Depot Issues: गुहागर एस.टी. आगारातील कमतरता तातडीने दूर करण्याची मागणी

डेपो मॅनेजर, मेकॅनिक व चालकांची पदे रिक्त; गणेशोत्सवापूर्वी १५ नवीन बसेस व मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे परिवहनमंत्र्यांना साकडे

रामपूर:

Guhagar ST Bus Depot Issues मुळे गुहागर तालुक्यातील प्रवासी सेवा पुरती कोलमडली असून आगारातील विविध समस्या आणि मनुष्यबळाची कमतरता तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस, ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण विकास ग्रामीण प्रवासी महासंघाचे कार्याध्यक्ष अनिल कुमार जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच एस.टी. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे ऑनलाईन निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

अनेक महत्त्वाची पदे रिक्त; ६५ ऐवजी केवळ ५९ बसेस सुरू

गुहागर आगाराचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत कमकुवत झाला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून गुहागर आगारात कायमस्वरूपी डेपो मॅनेजर (Depo Manager) तसेच इतर आवश्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. आगारासाठी एकूण ६५ बसेस मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ ५९ बसेस चालवाव्या लागत आहेत. परिणामी, स्थानिक व ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

गणेशोत्सवापूर्वी ‘या’ मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन:

  • नवीन बसेसची उपलब्धता: गुहागर आगारासाठी तातडीने १५ नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देणे.
  • रिक्त पदांची भरती: गणेशोत्सवापूर्वी आवश्यक चालक-वाहक, सुमारे ६० मेकॅनिक (Mechanic) आणि डेपो मॅनेजर यांची पदे भरणे.
  • चालक-वाहकांवरील ताण: ७०% चालक-वाहकांना डबल ड्युटी करावी लागत असल्याने अतिरिक्त चालक-वाहकांची भरती करणे.
  • यांत्रिकी विभाग सक्षम करणे: शिवशाही व इतर बसेस वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याने यांत्रिकी विभागात पुरेसे मनुष्यबळ देणे.

Guhagar ST Bus Depot Issues: गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल टळणार?

प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल होणार आहेत. त्यामुळे गुहागर आगारावर प्रवाशांचा अतिरिक्त ताण पडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून रिक्त पदे भरावीत आणि नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून चाकरमान्यांसह स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळेल, असे अनिल कुमार जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 20-08-2026