तीन दिवसांत २०० रुग्णांची तपासणी; १५ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी
रत्नागिरी :
Infigo Eye Care Retina Services संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात रेटीनासंबंधीत आजारांसाठी विशेष उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी शाखेत दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेटीना तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष ओपीडी व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमांतर्गत रेटीना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत यांनी इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या रत्नागिरी शाखेत तीन दिवसांत सुमारे २०० रुग्णांची तपासणी केली. तसेच रेटीनाशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवरील सुमारे १५ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.
वर्षभरात ५०० हून अधिक रेटीना शस्त्रक्रिया यशस्वी
इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण ५०० हून अधिक गुंतागुंतीच्या रेटीना शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रेटीनाचे आजार, डायबेटिक रेटिनोपॅथी, रेटिनल डिटॅचमेंट यांसारख्या गंभीर समस्यांवर वेळेवर निदान व उपचार न झाल्यास दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात रेटीना उपचारांसाठी विशेष सुविधा मर्यादित असताना, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये रेटीना तज्ज्ञांची नियमित भेट आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिल्याने स्थानिक रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
शासकीय योजनांतर्गत मोफत उपचारांची सोय
इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल हे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत समाविष्ट असणारे रुग्णालय आहे. या योजनांमुळे पात्र रुग्णांना रेटीनाशी संबंधित विविध आजारांवर उपचाराचा मोफत लाभ मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना यामुळे मोठी मदत होत असून अनेक रुग्णांनी या शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेत यशस्वी उपचार करून घेतले आहेत.
स्थानिक पातळीवर तज्ज्ञ उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन
रेटीना किंवा पडद्याच्या आजारांचे लवकर निदान आणि योग्य वेळी उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे असते. रत्नागिरी व परिसरातील रुग्णांना तज्ज्ञ रेटीना सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा निरंतर प्रयत्न आहे. शासकीय योजनांतर्गत डोळ्यांच्या अनेक मोफत शस्त्रक्रिया होत असल्याने रत्नागिरीमधील नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 29-08-2026














