Commercial LPG Price Hike: व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला!

सप्टेंबराच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ, घरगुती १४.२ किलोचे सिलेंडर दर स्थिर

नवी दिल्ली:
Commercial LPG Price Hike संदर्भात सरकारी तेल कंपन्यांनी सप्टेंबराच्या पहिल्याच दिवशी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दरात साडेआठ रुपयांची वाढ केली आहे. मात्र, सामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब म्हणजे घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नव्या दरवाढीनंतर मुंबई आणि दिल्लीतील नवे दर

नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरचा दर २७४७.५० रुपये झाला असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ग्राहकांना यासाठी २७०१ रुपये मोजावे लागणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 02-09-2026