Nepal Flood News: नेपाळमधील भीषण पुरामुळे हाहाकार: भारतासह चीन, अमेरिकेकडे नेपाळने मागितली नुकसान भरपाई

हवामान बदलामुळे हिमालयीन क्षेत्रात भीषण आपत्ती ओढावल्याचा नेपाळचा दावा; मदतीऐवजी हरितगृह वायू उत्सर्जनासाठी प्रमुख देशांना धरणार जबाबदार

Nepal Flood News : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत तब्बल १२-४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४२-६ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. पुराच्या तीव्रतेमुळे काही मृतदेह वाहून थेट भारतातही आले आहेत. सध्या बाधित भागांमध्ये बेपत्ता लोकांचा शोध आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.

भारताचा मदतीचा हात आणि नेपाळची भूमिका या आपत्तीनंतर नेपाळला मदत पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला. भारताने तातडीने बचावकार्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला होता, परंतु सुरुवातीला नेपाळने ही मदत स्विकारण्यास नकार देत मदतीऐवजी भरपाईची मागणी केली. भारताव्यतिरिक्त इतर काही देशांनीही नेपाळला मदतीचा हात पुढे केला आहे.

हवामान बदलामुळे आपत्ती आल्याचा दावा नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी रसुवा येथील भोटेकोशी नदीला आलेला पूर हा हवामान बदलाचा (Climate Change) परिणाम असल्याचे स्पष्ट केले. हिमालयीन क्षेत्रातील हवामान बदल हे मोठे आव्हान बनले असून, हिमालयाचे तापमान १.८ अंश सेल्सिअसने वाढल्याचे त्यांनी सोशल मीडियावर नमूद केले. बर्फ आणि पर्वताचा मोठा भाग उंचावरून कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या सरकारचे सर्व लक्ष शोधमोहीम, बचावकार्य आणि पीडितांपर्यंत मदत पोहोचवण्यावर केंद्रित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय मंचावर भरपाईची मागणी नेपाळने या आपत्तीसाठी केवळ मदतीवर अवलंबून न राहता थेट भरपाईची मागणी केली आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह हे प्रकरण संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) घेऊन जाण्याच्या तयारीत असून त्यासाठी विशेष योजना आखली जात आहे. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी या हवामान आपत्तीसाठी भारत, चीन आणि अमेरिका या तीन देशांना मुख्यत्वे जबाबदार धरले आहे.

उत्सर्जक देशांवर नेपाळचे बोट जगात सर्वाधिक हरितगृह वायूंचे (Greenhouse Gases) उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये भारत, चीन आणि अमेरिका यांचा समावेश होतो. त्यामुळे या देशांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाचा फटका नेपाळला बसला असून, या आपत्तीची भरपाई याच देशांनी दिली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका नेपाळने घेतली आहे. याशिवाय नेपाळने रशियाकडेही मदतीची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 03-09-2026