Sonography Machine Sealed: ‘श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’चे सोनोग्राफी मशिन सील; जिल्हास्तरीय पथकाची डिकॉय कारवाई

पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन

रत्नागिरी:

Sonography Machine Sealed आणि पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडणगड तालुक्यातील भिंगोळी येथील डॉ. प्रसाद आंबेकर यांच्या ‘श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील सोनोग्राफी मशिन जिल्हास्तरीय पथकाने डिकॉय कारवाई करत सील केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी व बेकायदेशीर प्रकार उघडकीस

Sonography Machine Sealed आणि आरोग्य पथकाची कारवाई

१ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय पथकाने या सोनोग्राफी सेंटरमध्ये डिकॉय केस करून अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी आणि बेकायदेशीर प्रकार समोर आले.

केंद्रात नोंदणीकृत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमन व्यास अनुपस्थित असताना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार सोनोग्राफी करण्यास सक्षम नसलेल्या डॉ. श्रद्धा आंबेकर (बीएएमएस) या स्वतः सोनोग्राफी करताना आढळल्या. तसेच नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर असताना त्यांच्या नावाचा शिक्का मारून अहवालावर स्वाक्षरी केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

नियमभंगाप्रकरणी प्रशासनाकडून तात्काळ कठोर पाऊल

सेंटरच्या कागदपत्रांची अधिक सखोल तपासणी केली असता, नोंदणीकृत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमन व्यास या पुरुष रुग्णांचीही सोनोग्राफी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नियमांचा थेट भंग आणि गंभीर गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने कारवाई करत सोनोोग्राफी मशिन सील केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 05-09-2026