अशोक खरात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये घोटाळ्याचा आरोप
सांगोला:
Ashok Kharat Movie Scam Allegation आणि सांगोल्यातील राजकीय-सामाजिक घडामोडींवरून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. अशोक खरात यांच्यावर चित्रीत होत असलेल्या ‘महाराष्ट्रा एल्फिन्स्टन फाईल’ (Maharashtra Epstein Files) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. सांगोला येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलताना त्यांनी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांना थेट सवाल करत माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरही राजकीय टोलेबाजी केली.
या मेळाव्याला राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि दीपाली सय्यद उपस्थित होत्या.
अशोक खरातच्या अघोरी पूजेचा दावा अन् शहाजीबापूंचा दीपाली सय्यद यांना सवाल
Ashok Kharat Movie Scam Allegation आणि सांगोल्यातील घडामोडी
मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन अघोरी पद्धतीने पूजा करून गेला आहे. सांगोल्यातील जवळ्या परिसरात उघड्या-नागड्या पद्धतीने धिंगाणा घालत त्याने माझ्या भाच्याला (अतुल पवार) निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आणि त्याला जिवाने मारण्यासाठी पूजा केली होती.
या प्रसंगाचा उल्लेख करत बापू म्हणाले, “मी माझ्या भाच्याला सांगितले की, तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे, तू मरत नाहीस, काळजी करू नको.” हा सर्व प्रकार सांगताना शहाजीबापूंनी दीपाली सय्यद यांना उद्देशून विचारले की, “अशोक खरातवर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात हा प्रसंग घेतला आहे का?”
अजितदादांनी इंदापूरला पाणी पळवले; संघर्षाची आठवण
पाण्याच्या प्रश्नावरून बोलताना शहाजीबापूंनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. “आमचे पाणी अजितदादांनी इंदापूरला पळवले होते आणि ते पाणी राखण्यासाठी आम्ही रक्तरंजित क्रांती करण्याची तयारी सुरू केली होती,” असे त्यांनी सांगितले.
माध्यमांमध्ये ही भूमिका जाहीर केल्यानंतर अजितदादांचा फोन आला आणि ‘तुमचे पाणीच नाही’ असे ते म्हणाले. मात्र, मी गावातूनच त्यांना कागदपत्रे उघडून बघण्यास सांगितल्यावर त्यांनी पाणी असल्याचे मान्य केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून असा टोकाचा संघर्ष न करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगत आपल्याला कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळाली नसल्याची खंत शहाजीबापूंनी व्यक्त केली.
राज्यात लवकरच ‘ऑपरेशन टायगर’; मंत्री भरत गोगावले यांचे संकेत
या मेळाव्यात बोलताना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी राज्यात लवकरच दुसरे ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे मोठे संकेत दिले. शहाजीबापू पाटील यांच्या कामाचे चीज झाले पाहिजे आणि त्यांच्या पुनर्वसनाची गरज आहे, असे गोगावले म्हणाले.
“एकनाथ शिंदे जेव्हा ऑपरेशन टायगर करतात, तेव्हा ते कोणालाच कळत नाही. लवकरच राज्यात आणखी एक दुसरे ऑपरेशन होणार आहे. मात्र, आताच सांगत नाही, नाहीतर मीडिया लगेच बातम्या करेल,” असे म्हणत गोगावले यांनी आपल्या भाषणात गूढ वाढवले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 05-09-2026














