ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
गुहागर, रत्नागिरी:
Leopard Terror in Guhagar आणि बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे गुहागर-विजापूर महामार्गालगत असलेल्या काजळी गावात नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. काजळी येथील स्थानिक रहिवासी दर्शन चव्हाण यांच्या घराच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून मध्यरात्री एका महाकाय बिबट्याचा वावर कमालीचा वाढला आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या दर एक-दोन दिवसाआड या घराभोवती तासनतास फेऱ्या मारत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चव्हाण यांनी घरात सीसीटीव्ही बसवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
केवळ तीन महिला राहणाऱ्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात
Leopard Terror in Guhagar आणि स्थानिक कुटुंबाची चिंता
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन चव्हाण यांच्या घरात सध्या केवळ तीन महिलाच राहतात. त्यापैकी एक महिला सातत्याने आजारी असते. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणत्याही कामासाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास या महिलांना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागत आहे. दारातच बिबट्याचा सततचा वावर असल्याने या कुटुंबाची सुरक्षा आता पूर्णपणे धोक्यात आली असून चव्हाण कुटुंबासह संपूर्ण काजळी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची चिंता वाढली
अवघ्या काही दिवसांवर लाडक्या गणरायाचे म्हणजेच गणेशोत्सवाचे आगमन होत आहे. कोकणात गणेशोत्सवादरम्यान रात्री शेजारी-पाजारी आरती, भजन व जागर करण्यासाठी जाण्याची जुनी प्रथा आहे. मात्र, अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी गावात फिरणे अत्यंत जोखीमीचे बनले आहे. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी काजळी गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 05-09-2026














