शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
रत्नागिरी:
Ratnagiri Youth Assault Case आणि किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण केल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. शहरातील चर्मालय येथील चार रस्त्यावर एका तरुणाची अज्ञात कारणातून दुचाकी अडवून त्याला कड्याने मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. ही घटना गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
कड्याने डोक्यात मारून दुखापत; संशयितावर गुन्हा दाखल
Ratnagiri Youth Assault Case आणि घटनेचा तपशील
याप्रकरणी रोहन संजय धोत्रे (वय २३, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेबाबत आकाश चंद्रकांत खेत्री (वय २४, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सायंकाळी फिर्यादी आकाश खेत्री हा आपल्या दुचाकीवरून चर्मालय चार रस्ता येथून जात होता. त्यावेळी संशयित रोहन धोत्रे याने त्याची दुचाकी अचानक अडवली आणि कसलाही विचार न करता हातातील कड्याने आकाशच्या डोक्यात मारून त्याला गंभीर दुखापत केली. मारहाणीनंतर संशयिताने त्याला अवाच्य भाषेत शिवीगाळही केली.
भारतीय न्याय संहितेनुसार पोलीस कारवाई
आकाश खेत्री याच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित आरोपी रोहन धोत्रे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), १२६(२), ३५२ तसेच भादंवि कायदा कलम ३२४, ३४१, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 05-09-2026














