खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
खेड, रत्नागिरी:
Furus Aamshet House Burglary आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. फुरस-आमशेत येथे घराच्या छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत रोख रकमेसह एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २ सप्टेंबर रोजी रात्री ८.१५ वाजल्यापासून ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी फैज परकार अहमद इब्राहिम (वय ६३, व्यवसाय शेती, रा. फुरस-आमशेत, ता. खेड) यांच्या राहत्या घरी घडली.
छताची कौले काढून अनधिकृत प्रवेश; कपाट अन् दानपेट्या फोडल्या
Furus Aamshet House Burglary आणि चोरीचा घटनाक्रम
फिर्यादी फैज परकार हे घरात नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या छतावरील कौले काढून घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडला.
चोरट्याने कपाटातील ३७ हजार रुपये रोख रक्कम लांबवली. याशिवाय हॉलमध्ये ठेवलेल्या दोन दानपेट्या फोडून त्यातील सुमारे ४ हजार रुपये रोख, अशी एकूण ४१ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
खेड पोलिसांत तक्रार; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू
घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच फिर्यादी फैज परकार यांनी तातडीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 05-09-2026














