दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात सर्वाधिक काळ सतत पंतप्रधान राहण्याचा मेलोनी यांच्या नावावर विक्रम
नवी दिल्ली:
PM Modi Congratulates Meloni आणि इटलीच्या राजकारणातील एका मोठ्या विक्रमाची सध्या जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा इतिहास रचला आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर इतिहासात इटलीमध्ये सर्वाधिक काळ सतत पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मेलोनी यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे मेलोनी यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
“मेलोनी यांच्या नेतृत्वावर इटलीच्या जनतेचा भक्कम विश्वास”
PM Modi Congratulates Meloni आणि पंतप्रधान मोदींचा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खास पोस्ट शेअर करत मेलोनी यांचे अभिनंदन केले. “माझ्या प्रिय मैत्रीण पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे इटलीच्या युद्धोत्तर इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ सतत पंतप्रधान राहिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन,” असे मोदी यांनी लिहिले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मेलोनी यांची ही यशोगाथा इटलीच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला भक्कम विश्वास दर्शवते. आगामी वर्षांमध्येही त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या.
भारत-इटली धोरणात्मक संबंध अधिक मजबूत होणार
आपल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि इटली यांच्यातील वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही पुनरुच्चार केला. मेलोनी यांच्या मैत्रीमुळे भारत-इटली यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी (Strategic Partnership) अधिक मजबूत होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांतील जनतेच्या उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी आपण मेलोनी यांच्यासोबत सातत्याने काम करण्यास उत्सुक असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
१,४१३ दिवस सत्ता सांभाळत सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचा विक्रम मोडला
जॉर्जिया मेलोनी यांचे तीन पक्षांचे आघाडी सरकार तब्बल १,४१३ दिवसांपासून सत्तेत आहे. त्यांनी २००० च्या दशकातील सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या सरकारचा विक्रम मागे टाकला आहे. इटलीमध्ये वारंवार सरकारे बदलणे आणि राजकीय अस्थिरता असणे हे अत्यंत सामान्य मानले जाते. अशा स्थितीत मेलोनी यांचे सरकार सलग चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असणे ही इटलीच्या राजकारणातील दुर्मिळ घटना आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. या विक्रमानंतर प्रतिक्रिया देताना मेलोनी म्हणाल्या, “सरकारची स्थिरता केवळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नसते, तर यामुळे देशाला दीर्घकालीन योजना आखण्यास आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास मदत होते.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 05-09-2026














