महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून २.९ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु
गणपतीपुळे / रत्नागिरी:
Tavsal Jaigad Bridge Construction आणि कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जयगड खाडीवरील गुहागर तालुक्यातील तवसाळ आणि रत्नागिरी परिसराला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) तब्बल ७१५ कोटी रुपये खर्च करून हा भव्य केबल-स्टेड (Cable-stayed) पूल उभारला जात आहे.
सुमारे २.९ किलोमीटर लांबीचा हा सागरी पूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार; पर्यटकांना मिळणार खाडीच्या विहंगम दृश्याचा आनंद
Tavsal Jaigad Bridge Construction आणि प्रकल्पाचे वैशिष्ट्य
हा पूल पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी आणि गुहागर या दोन्ही प्रमुख तालुक्यांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, या पुलाच्या सुरक्षेचा आणि सौंदर्याचा विचार करता पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्गाची (Pedestrian walkway) स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे जयगड खाडीचे नयनरम्य आणि विहंगम दृश्य पर्यटकांना पुलावरून प्रत्यक्ष अनुभवता येणार असून, या भव्य प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन आणि स्थानिक अर्थकारणाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फेरीबोटीच्या प्रवासातून मुक्ती; सागरी मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार
कोकणवासीयांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना सागरी किनारपट्टीच्या भागातून प्रवास करताना अनेकदा फेरीबोटीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध खाड्यांवर सागरी पूल उभारण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. तवसाळ-जयगड पुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 05-09-2026














