बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समितीच्या वतीने आयोजन
गणपतीपुळे:
Watad Purva Jetavan Buddha Vihar Varshavas Event आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रत्नागिरी तालुक्यात करण्यात आले आहे. बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा व संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ३१ वाटद पूर्व गावशाखेतर्फे रविवारी, ६ सप्टेंबर रोजी वाटद पूर्व बौद्धवाडी येथील जेतवन बुद्धविहारात वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
Watad Purva Jetavan Buddha Vihar Varshavas Event आणि उपस्थितांची माहिती
या कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय सुहास कांबळे, मंगेश सावंत, रविकांत पवार, प्रकाश पवार, स्वप्निल जाधव, प्रिया जाधव, सोनाक्षी कदम आणि संदेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 05-09-2026














