Lanja Matka Gambling Case: लांजात कल्याण मटका जुगारावर पोलिसांची धाड; एकावर गुन्हा दाखल

लांजा पोलिसांची धडक कारवाई; बंद टपरीच्या आडोशाला चालणाऱ्या जुगाराचा पर्दाफाश

लांजा (विशेष बातमीदार): लांजा-कोर्ले रस्तनावरील एका चायनिज सेंटरजवळ बंद टपरीच्या आडोशाला बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कल्याण मटका जुगारावर लांजा पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. ५ सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत एका संशयिताविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lanja Matka Gambling Case: जुगाराचे साहित्य अन् रोख रक्कम जप्त

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत परशुराम कांबळे (वय ४८, रा. देवधे बौद्धवाडी, ता. लांजा) हा संशयित स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगार खेळवण्याच्या उद्देशाने लोकांकडून पैसे स्वीकारत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.

लांजा पोलिसांत गुन्हा नोंद

बेकायदेशीरपणे जुगार चालवताना आढळून आल्याने संशयित भारत कांबळे याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 07-09-2026